पावभाजी ... जना मनातली... आणि हृद्य आठवणीतली
पावभाजी पुराण ... जना मनातली... आणि हृद्य आठवणीतली पुण्यात आता मस्त थंडी पडायला लागलीय.. आणि थंडी म्हटलं कि बाजार अगदी कसा खुलून जातो छान छान ताज्या स्वच्छ भाज्यांनी. थंडीमध्ये करायची अनिवार्य गोष्ट म्हणजे पावभाजी ... परवाच मस्त शुभ्र गोरापान फ्लॉवर , हिरवी हिरवी गावरान सिमला मिरची, नखरेल गोड गोड मटार आणि रसरशीत लाल लाल टोमॅटो मिळाले.. मग काय मस्त पावभाजीचा बेत ठरला. छान पैकी घरी रवी नि घुसळून आलेलं लोणी होतच हाताशी.. मग ठरवलं अमूल बटर पेक्षा आज लोण्यामध्ये पावभाजी करू... आणि सोबतीला गरम गरम पाव.. लिंबाची फोड आणि बारीक चिरलेल्या कांदा कोथिंबिरीची नक्षी.. अहाहा स्वर्गसुख म्हणतात ते हेच. पहिलाच घास खाल्ला आणि मन एकदम पावभाजीच्या हिंदोळ्यावर डोलू लागलं. अगदी ३० वर्ष मागे गेले... तेव्हा मी पाचवी सहावी मध्ये असेन. दरवर्षी शिरस्त्या प्रमाणे आम्ही सुट्ट्यांमध्ये एकदा पुणे आणि एकदा मुंबई ला जायचो. पुणे मुंबई च्या तुलनेत नाशिक तेव्हा तसं छोटसं टुमदार शहर (छे गाव च ) होते..घरी पावभाजी सारखे पदार्थ अभावानेच बनत.. हॉटेल मध्ये खाण...