पावभाजी ... जना मनातली... आणि हृद्य आठवणीतली

पावभाजी पुराण ... जना मनातली... आणि हृद्य आठवणीतली 

पुण्यात आता मस्त थंडी पडायला लागलीय.. आणि थंडी म्हटलं कि बाजार अगदी कसा खुलून जातो छान छान ताज्या स्वच्छ भाज्यांनी. थंडीमध्ये करायची अनिवार्य गोष्ट म्हणजे पावभाजी ... परवाच मस्त शुभ्र गोरापान फ्लॉवर , हिरवी हिरवी गावरान सिमला मिरची,  नखरेल गोड गोड मटार आणि रसरशीत लाल लाल टोमॅटो मिळाले.. मग काय मस्त पावभाजीचा बेत ठरला. छान पैकी घरी रवी नि घुसळून आलेलं लोणी होतच हाताशी.. मग ठरवलं अमूल बटर पेक्षा आज लोण्यामध्ये पावभाजी करू... आणि सोबतीला गरम गरम पाव.. लिंबाची फोड आणि बारीक चिरलेल्या कांदा कोथिंबिरीची नक्षी.. अहाहा स्वर्गसुख म्हणतात ते हेच. 

पहिलाच घास खाल्ला आणि मन एकदम पावभाजीच्या हिंदोळ्यावर डोलू लागलं. 

अगदी ३० वर्ष मागे गेले... तेव्हा मी पाचवी सहावी मध्ये असेन. दरवर्षी शिरस्त्या प्रमाणे आम्ही सुट्ट्यांमध्ये एकदा पुणे आणि एकदा मुंबई ला जायचो.  पुणे मुंबई च्या तुलनेत नाशिक तेव्हा तसं छोटसं टुमदार शहर (छे गाव च ) होते..घरी पावभाजी सारखे पदार्थ अभावानेच बनत.. हॉटेल मध्ये खाणे हि luxury  होती ... (साधारणपणे ८९-९० साल)

पुण्याला गेलो कि सर्व नातेवाइकांकडे सदिच्छाभेट देत असू.. तेव्हाच एकदा आम्ही विजयानगर कॉलनी सारख्या उच्चभ्रू वस्ती(!) मध्ये राहणाऱ्या आईच्या मामांकडे श्री. श्रीराम गोगटे ह्यांच्या कडे जेवायला बोलावलं होते. जातानाच एकूणच बालसुलभ आणि "कुठठे न्यायची सोय नाही" कॅटेगरीत असल्यामुळे आईने खूप पट्टी पढवून ठेवली होतीच.. कारण श्रीराम मामा आजोबा आणि निर्मल मामी (प्रसिद्ध मराठी अभिनेते राजा परांजपे ची नातेवाईक )जिथे राहत त्या श्रीमंगेश सोसायटी मधेच उन्हाळ्यात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर राहत असत आणि सेंचुरीत्या साठी खाली पोलीस तंबू टाकून राहत.... त्यांच्याशी गोगटे कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध होते.त्याकाळचे सीए असलेले मामा आजोबा आणि सुविद्य मामी आजी मोठ्ठे  प्रस्थ आहे असे वाटू लागले. नाशिक ला वाडयात राहणारे आम्ही त्या प्रशस्त सुसज्य फ्लॅट सिस्टिम मध्ये अगदी हरखून जात असू. आमच्या मानानी ते फारच हायफाय वाटत पण प्रत्यक्षात अतिशय आपुलकीने वागत  ... तर तिथे पहिल्यांदा पावभाजी खायचा योग् आला... 

माझी आई हि तिच्या चारही भावंडांमध्ये थोरली .. आणि त्यामुळे मामांची लाडकी भाची.. निर्मल मामी आजी नि प्रेमाने आमच्यासाठी पावभाजी केली होती.. अहाहा काय सुंदर चव होती..एकतर नावीन्य होते आणि वर मस्त लोण्याचा पांढरा गोळा घातलेली ती चविष्ट भाजी .. त्या चवीनी जे मनात घर केलय ना ..  त्याच्या अगदी जवळ परवा मी केलेली भाजी झाली होती... पण अगदी तशीच चव केवळ अशक्यच.. 

जेव्हा केव्हा मुंबईला जात असू तेव्हा, किंग्ज सर्कल ला स्वाती मावशी आणि दिलीप काका आम्हा मुलांना जीवाची मुंबई करवत.. अगदी, घारापुरी केव्हज पासून, गेट वे ऑफ इंडिया, दादर चौपाटी , म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन, सायन टेकडी,गोराई बीच, एस्सेल वर्ल्ड किती गोष्टी त्यांच्याबरोबर फिरलो. माटुंग्याच्या माहेश्वरी उद्यान आणि तिथेच जवळ फ्लाय ओव्हर खाली असलेल्या क्लासिक पावभाजी ची पिझ्झा आणि पावभाजी... ती म्हणजे पहिली हॉटेल ची चैन असलेली पावभाजी.. त्यामुळे तिच्याबद्दल पण जिव्हाळा आहे... 

एकदा डिसेंबर ९२ साली माझ्या आतेभावाच्या लग्नानंतर कल्याण-नाशिक  बसनी नाशिकला परत आल्यावर आम्ही आत्येमामे भावंडांनी देवळालकरांच्या इथली हॉटेल बाप्पाज पावभाजीची पुलावासोबत खाल्लेली पावभाजी हि नाशिकमध्ये हॉटेलमध्ये खाल्लेली पहिली पावभाजी.. त्यामुळे ती पण खासच.. 

हळूहळू तिचं नावीन्य संपत गेले... आणि अगदी माणसाळलीच ती .. इतकी कि शाळेसमोर (सारडा कन्या विद्या मंदिर) असलेल्या नेहरू बागेजवळ अतिक्रमित गाड्यांवर उकडून ठेवलेला बटाटे आणि पिवळ्या फ्लॉवरचा शिसारी येणारा वास आणि त्या धूळ खात ठेवलेल्या ढब्बू मिरच्या आणि टोमॅटो ... त्यामुळे पावभाजी खाण्यातली वासनाच मेली.. 

पण म्हणतात ना ... every death has a new rebirth... तसच झाले... ९४-९५ साली माझ्या वर्गातली मैत्रीण तृप्ती घैसासच्या वाढीदिवसाला आणि डब्यात खाल्लेल्या चवींनी परत ती नवीन रूपात (घरगुती स्वरूपात) आवडू लागली..नंतर एकदा सुषमा काकू(श्रीकांत मुजुमदार ) नि केलेली आणि नितीन दादाच्या बंगल्यात खाल्लेली भाजी पण स्मरते... मग हळूहळू आई पण घरी वर्षातून एकदा पावभाजी करायला लागली आणि तरबेज बनली.. इतकी कि भोपळा,बीट, गाजर अश्या भाज्या बेमालूम पद्धतींनी पोटात ढकलू लागली.... पण पाव आधीच ऑर्डर  लागत असे. नाशिकला तेव्हा आदर्श ब्रेडच होता नंतर घराजवळ सचिन बेकरी चालू झाली.. मला अजूनहि शिळी, आदल्यारात्रीची मुरलेली भाजी खूप आवडते.  

पुण्याला शिकायला आल्यावर १९९८-२००१ विविध चवीच्या विविध ठिकाणच्या,नळ स्टॉप चे स्वीकार, समुद्र, सहकार नगर च रिलॅक्स, गणपती बघायला फिरत असताना राजूकाका बरोबर खाल्लेली SP जवळची गिरीजा ची ती ... अश्या अनेक आठवणीतल्या जागा... 

नंतर होसूरला गेल्यावर तिला प्रचंड मिस्स केलं. नाशिक पुणे जाणं झाली कि तिला खाणं मस्टच झालं . पण  बंगलोर ला सेटल झाल्यावर, रूममेट वंदू च्या हातची बम्बईय्या पावभाजी पण खूप मस्त असायची..

यथावकाश लग्न झाल्यावर पुण्यामध्ये परत आल्यावर ...आणि कोथरुडकर झाल्यावर ,घरी केलेली , मयूर पावभाजी आणि कडक्क पाव , ओव्हर hyped बेक्कार गर्दीची सुप्रीम, गरजेला आवश्यक जवळची अशी , पृथ्वी,शीतल,गेलाबाजार पालवी, मुक्ताई , जुने ऋग्वेद ची आणि आता नवीन ग्रीनफूड ची ती.. आपली होऊन गेली.

अजून एक मनात घर  करून बसलेली ती म्हणजे, गोडबोले केटररची मुलीच्या वाढदिवसाची तिची चव... 

३० वर्षात तिचं कित्ती ठिकाणची वेगवेगळी चव, रंग, रूप,कन्टेन्ट अनुभवलंय ... आता हॉटेलच अप्रूप पण संपलय आणि ऍसिडिटी चा त्रास न होणारी सौम्य , पण चविष्ट अशीच ती जवळची वाटू लागलीय.. तीच ती पहिल्यांदा खाल्लेल्या पावभाजीची चव जी अजूनहि मनात हृदयाच्या एका कप्प्यात अजूनहि रुतून बसली आहे... 

पावभाजी आता चांगलीच मुरली आहे.... आणि परवा मीच बनवलेल्या तिच्याशी मी एकरूप होऊन गेले आहे ...त्यामुळे हा लेखन प्रपंच...   समता मुजुमदार 


 





Comments

  1. अफलातून लिहिले आहेस....मलाही सर्वात आधी म्हणजे 1993 च्या वेळी near lekhanagar highway खाल्लेली ती पाव भाजी अजून लक्षात आहे....नंतर ही खूप पाव भाजी झाल्या- कधी नासिक तर कधी मुंबई....in fact I remember pav bhaji at taj hotel - gateway of India che....I had it at 6am after a walk from worli sea face to colaba and it was totally fabulous...thanks for bringing back those memories...

    ReplyDelete
  2. एकच नंबर...पाव भाजी बेस्ट च
    असते. आणि खरंय साधा चार जिन्नसांच्या चहाच्या चवित इतकी variations येतात तिथे दुसरीकडच्या पाव भाजी ची सेम चव आपल्याकडे आणणं अशक्यप्रायच. म्हणून खरोखरच पावभाजी मेमरीज पक्क्या होतात.
    मस्त सफर घडवलीस

    ReplyDelete
  3. मस्तं लिहिले आहेस गं समता... तुझा ब्लॉग आता माहित झाला..

    ReplyDelete
  4. Superb. Very lucid language and nicely framed.

    ReplyDelete
  5. समता, खूपच छान लिहिलं आहेस. तुझ्या लेखाच्या निमित्ताने माझं पावभाजी वरचं जिवापाड प्रेम मला आज पुन्हा नव्यानं जाणवलं. मला तर वाटतं, की पावभाजी हा केवळ एक पदार्थ नाही, तर एक key word आहे. जशी प्रत्येक ठिकाणच्या पावभाजी ची चव वेगळी, तशीच त्या त्या ठिकाणच्या पावभाजी related आठवणी ही वेगळ्या. मित्र मैत्रिणींबरोबर फिरायला गेल्यावर, आई बाबांबरोबर लहानपणी हॉटेल मधे खाल्लेली, शॉपिंग करून दमल्यावर, प्रवासात किंवा नवख्या ठिकाणी safest option म्हणून ऑर्डर केलेली अशी अनेक रूपं आहेत पावभाजी ची. I am sure, our love affair with पावभाजी will last forever ❤️

    ReplyDelete
  6. एकदम झक्कास लिहिलं आहेस आणि त्यामुळे पाव भाजी शी निगडित अनेक आठवणी जाग्या झाल्या! नाशिकला कुलकर्णी's, बाप्पा's किंवा मेहेर वरच्या 'गारवा' मध्ये डबा घेऊन जाणे आणि पावभाजी, पावाचा खमंग सुवास घेत, तो डबा गरम पावभाजी ने भरून कित्येक वेळेस घरी आणलेला आठवतो... Thank you :)

    ReplyDelete
  7. खुप छान लिहिता तुम्ही. खुपच सुंदर!!

    ReplyDelete
  8. वाह समता... छान लेखन आणिअगदी पावभाजी एकदम झक्कास आस्वाद घेतला असे वाटले.... तू केवळ तांत्रिक अभियंता नसून एक उत्तम लेखिका देखील आहेस त्याचा मला प्रत्यय आला... तुझ्या हा साहित्यिक लेखन प्रपांचाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!!

    मला तुझा खूप अभिमान वाटतो!!

    धन्यवाद!!

    ReplyDelete
  9. Wah sam very nicely written about pav bhaji....great writer...

    ReplyDelete
  10. मस्त लिहिलं आहेस ..आत्ताच पावभाजी खावीशी वाटतेय

    ReplyDelete
  11. मस्त लिहिलं आहेस ..आत्ताच पावभाजी खावीशी वाटतेय

    ReplyDelete
  12. Dishwasher service in dubai
    https://www.hometech.ae/service/dishwasher-service/
    UAEs Authorized Major brand Dishwasher Service in Dubai, On-Demand experienced professionals for dishwasher service in Dubai.
    1631768615701-10

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Bosch Dishwasher Review and Buying guide

शाळा पुराण

माझी आजी ..