दांडेली कर्नाटक
दांडेली कर्नाटक २१ डिसेंबर २०२० प्रस्तावना मार्च २०२० पासून कोरोना मुळे घरातच अडकून पडलेले आम्ही भटके... आता कोरोनाचे आकडे पण थोडे आशावादी, दिसत होते..जरा धीर बळावलेला आणि मुख्य म्हणजे कोरोना कृपेने WFH केल्यानी चिक्कार सुट्ट्या शिल्लक होत्या..कुठेतरी जाऊच आता असा झालं होत. नाताळ आणि नवीन वर्षाची गर्दी टाळण्यासाठी आम्ही २१ - २३ डिसेंबर , सोमवार- बुधवार हे दिवस ठरवले. २-३ दिवस जाता येईल, गर्दी टाळता येईल तरीही मस्त मज्जा येईल आणि ताजेतवाने होऊन नवीन वर्षाची सुरुवात करू असा विचार करत २-४ ऑपशन्सचा विचार चालू केला .... पहिला अर्थातच महाबळेश्वर/ कोंकण, चोरला घाट/ गोवा , हम्पी/बदामी आणि दांडेली (अनेक वर्षांपासून wish लिस्ट मध्ये असलेले हे ठिकाण) ... ...सेल्फ ड्राईव्ह शक्य असलेली ठिकाणे बराच उहापोह करून झाला .. महाबळेश्वर/ कोंकण गजबजलेलं असेल आणि य वेळा जाऊन आलोय, चोरला घाटामधलं wilder-nest रिसॉर्ट फुल्ल होतं. हम्पी/बदामी (५००किमी) २-३ दिवसात खूप हेक्टिक होईल आणि पूर्ण न्याय देता येणार नाही ... मग दांडेली ला...