Posts

Showing posts from March, 2022

माझी आजी ..

Image
 माझी आजी ..  निर्मला ताई मराठे आज आज्जीला (निर्मला ताई मराठे) ना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं...ती गेली तेव्हा ८८ वर्षांची होती. अतिशय करारी सुशिक्षित आणि स्पष्टव्यक्ती..त्या काळात एकटी राहून गोव्यामध्ये नोकरी केलेली. जगायची खूप खूप आवड.. हत्ती मोर,आणि त्याच्या कलाकुसरीने भरलेल्या, paint kelelya,कशीदाच्या भार्री सुती किंवा सिल्क च्या साड्या.. अतिशय आवडीचे. चालायचा कंटाळा आणि TV बघण्याची आणि फोनवर बोलण्याची फार हौस. वाढदिवसाला तर सकाळी दिवसच तिच्या फोननी सुरु व्हायचा.  पण तिची जगायची इच्छा संपली आहे असा साधारण ऑक्टोबर 2020 मध्ये च जाणवायला लागलं होतं...जानेवारी 2021 च्या hospitalization नंतर ते प्रकर्षाने जाणवत होतं... तिची खाण्या वरची इच्छा कमी होत चालली होती...sugar अचानक कमी होत होती...पण तीचा जीवना कडे बघायचा सकारात्मक दृष्टिकोण वाखाणण्याजोगा होता... शेवटच्या दोन महिन्यांत अगदी सगळेच भेटून गेले होते तिला दीर, जावा, मुलमुली, भाचरी, नातवंडं, पन्तवंड सर्व सर्वजण ...रक्ताच्या नात्या सारखीच नाती जपली होती तिने...अगदी आजोबा गेल्यावरही... मला COEP मध्ये ऍ...