माझी आजी ..
माझी आजी .. निर्मला ताई मराठे
आज आज्जीला (निर्मला ताई मराठे) ना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं...ती गेली तेव्हा ८८ वर्षांची होती. अतिशय करारी सुशिक्षित आणि स्पष्टव्यक्ती..त्या काळात एकटी राहून गोव्यामध्ये नोकरी केलेली. जगायची खूप खूप आवड.. हत्ती मोर,आणि त्याच्या कलाकुसरीने भरलेल्या, paint kelelya,कशीदाच्या भार्री सुती किंवा सिल्क च्या साड्या.. अतिशय आवडीचे. चालायचा कंटाळा आणि TV बघण्याची आणि फोनवर बोलण्याची फार हौस. वाढदिवसाला तर सकाळी दिवसच तिच्या फोननी सुरु व्हायचा.
पण तिची जगायची इच्छा संपली आहे असा साधारण ऑक्टोबर 2020 मध्ये च जाणवायला लागलं होतं...जानेवारी 2021 च्या hospitalization नंतर ते प्रकर्षाने जाणवत होतं... तिची खाण्या वरची इच्छा कमी होत चालली होती...sugar अचानक कमी होत होती...पण तीचा जीवना कडे बघायचा सकारात्मक दृष्टिकोण वाखाणण्याजोगा होता... शेवटच्या दोन महिन्यांत अगदी सगळेच भेटून गेले होते तिला दीर, जावा, मुलमुली, भाचरी, नातवंडं, पन्तवंड सर्व सर्वजण ...रक्ताच्या नात्या सारखीच नाती जपली होती तिने...अगदी आजोबा गेल्यावरही...
मला COEP मध्ये ऍडमिशन मिळाल्यावर (१९९८) आजोबांची खूप इच्छा होती एकातरी नातवंडांनी त्यांच्याजवळ राहून शिकावे.. आणि तसही मला माझ्या बाबांनी hostel ला ठेवलच नसतं
मी सुरुवातीला शिक्षणासाठी पुण्याला तिच्या नावडीने मग सवडीने आणि शेवटी आवडीने राहू लागले...त्यात मी COEP मधून Mechanical Engineering केल्याचा अभिमान होता त्यांना.
कोण आनंद होता आजी आजोबांना मला होसुर बंगळुरूला नोकरी लागल्याचा...स्वखर्चाने विमान प्रवास करुन तिकडे आले होते दोघे...
माझे M.Tech झाल्यावर पहिलं बक्षीस त्यांनीच दिलंय...कोण कौतुक...
साग्रसन्गीत श्रावण सवाष्ण म्हणून, दिवाळी म्हणून अगदी अधिकमास सुद्धा शेवट पर्यंत केला जावई नातजावयांचा...
मी केलेली पाणी पूरी, मोदक फार आवडायचं त्या दोघांना...आताही केले की प्रकर्षाने आठवण येतेच...गणपतीला संध्याकाळी जाऊन तिला मोदकाचा डब्बा घेऊन जाणे हा नियमच होता मला...
शेवटच्या hospitalization च्या वेळेस सीमा मावशी आणि मी दोघीही घरी तापाचा patient म्हणुन जाऊ शकलो नव्हतो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात..अगदी जायच्या दोनच दिवस आधी मी घरी जाऊन भेटून आले लाडू भरवला नेलेला तेव्हाही तिनी शर्वरीच्या (माझी मुलगी) तब्येतीची चौकशी केली बोलवत नव्हत तरीहि..तेव्हाच मला कल्पना आलीच होती हे काही फार काळ नाही चालणार असं लगेच मी सीमा मावशीला फोन केला..हे मला काही खरं दिसत नाहीय असा...लगेच दुसर्या दिवशी राजूकाकाही भेटून आला...आणि 22 तारखेला ती तिच्या इच्छेप्रमाणे गेली अनंताच्या प्रवासाला...शतशः नमन
समता..
समता खूप छान यथार्थ वर्णन केले आहेस. मधु काका आणि अरुंधती वहिनींना खरच सगळ्यांचे कौतुक आणि प्रेम होते. अभिषेक दहावी बारावी engineer झाला तेव्हा सुद्धा त्यांनी त्याला आवर्जून बक्षीस दिले होते. असे प्रेमळ कौतुक करणारे काका काकू यांची आम्हालाही कायम आठवण येते.
ReplyDeleteThank you 😊
Deleteसमता खूप छान व्यक्त केले आहेस तुझे आजी च्या आठवणी, आजी सगळ्यांनचा कौतुक होता , आणि भरपूर गप्पा मारायची हौस. तू जवाबदारी ने त्यांची सेवा केलीस हे ही कौतुकाचे आहे
ReplyDeleteसुंदर अशीच छान लिहीत रहा..... 💫👍🏻🌈✒️
ReplyDeleteThank you
ReplyDelete