Posts

Showing posts from February, 2024

शाळा पुराण

 शाळा पुराण... अथपासून इतिपर्यंत   मागच्या आठवड्यात, लेकीच्या शाळेत निरोप समारंभ होता. आणि त्याची लगबग तर किती.. काळी ट्रेण्डी साडी (ती काकूबाई जरीसरी ची नाही हा) ब्लॉउज, केशरचना आणि काय काय..तीन वर्षांची गोंडस चिमुरडी ते दहावी कित्ती मोठा काळ शाळेत व्यतीत झाला.. तिचा आणि त्या अनुषंगानी आमचाही.. तेरा वर्ष एकाच शाळेत तिच्या बरोबरचे अनेक सवंगडी एकमेकांबरोबर शिकत भांडत मस्ती करत मोठी होत आता एकदम साड्यामध्ये मुली आणि टाय ब्लेझर मधली एकदम मोठी झालेली मुलं आयुष्याच्या एका मुख्य टप्प्यावर उभे आहेत. का कोण जाणे मन अगदी हळवं झालं आणि अगदी स्वैरपणे भूतकाळात चक्कर मारून आलं. कित्ती कित्ती त्या आठवणी..  ह्या अश्या नर्सरी ते दहावी प्रवासाची सुरुवात तर फार फार मजेशीर आहे बरका...  तर २०१० चा नोव्हेंबर डिसेंबर महिना.. सगळीकडे शाळेच्या ऍडमिशनचे फॉर्म मिळण्याची लगबग.. काही शाळेत तर पहाटे पहाटे ४ - ४. ३० वाजल्यापासून कुडकुडणाऱ्या थंडीत (पूर्वीच पुणे राहिला नाही हो आता 😜)लाईन मध्ये उभे राहून फॉर्म मिळण्याचे ते दिवस.. तेव्हा इंटरनॅशनल स्कूल्स CBSE / ICSE ची कोथरूड मध्ये तरी चलती नसलेले दिवस. घराजवळच्या ४