Shala... MRSKVM...Part 2


असाच रुळता रुळता आम्ही सहावी मध्ये कधी पोहोचलो कळलेच नाही.
ते शाळे मधला शिरीषा चे झाड त्याची छान छान नाजुकशी पडलेली फुलं गोळा करणं ... तो व्यायामाचा तास आणि high school ground la round.आणि त्यात शोधलेली पळवाट आणि शॉर्ट कट .. Dodge-ball..  सप्रे बाई आणि ओढेकर बाई ची शिस्त ...सातवी च्या वर्गातून दिसणारे टेनिस कोर्ट आणि जिमखाना ... त्या बद्दल च कुतूहल .. भैय्या च घर .तिथला सीताफळाचं झाड .. विलायती चिचे च झाड, बाळगटा ची शाळा...
सहावी मध्ये नवीन नवी कोरी BSA chi Grey colour chi लेडीज सायकल ...एकमेकींच्या अंगावर ते एक चिकटणार आणि खाजणारी खाजखुजली (sticky plant)   कित्ती कित्त्ती गोष्टी
प्रार्थना म्हणणाऱ्या आणि सामूहिक PT ला समोर उभ्या राहून व्यायाम करणाऱ्या मुली (तस एक दोनदा मला हि ती संधी मिळाली होती हा )
मला अजूनही आठवतंय एकदा विज्ञान विषयामध्ये पन्नास पैकी वीस मार्क मिळाले होते. आणि मी तो पेपर चित्रकलेच्या रंगाच्या पिशवीत लपवून ठेवला होता. अशी धुलाई झाली होती माझी की विचारू नका. तेही सहावी की सातवीत असताना...
सहावी मध्ये हळू हळू काश्मीरा/ ज्योती, सोनाली शॉचे / शिल्पा शिंपी (चित्रकला expert जपान ला का कुठे तरी हिची चित्र गेली होती प्रदर्शना साठी. ), शिल्पा बोहोरा/ हर्षदा देशपांडे तेंव्हा पासून च ती बॅडमिंटन खेळायची , कविता/अदिती/योगिनी /जकातदार , निनाली / राधिका , पबाकू / शीतल ब्रह्मेचा , राखी/श्वेता/अर्चना/शेवाळे अश्या काही जोड्या तयार व्हायला लागल्या. मी तेव्हा थोडा काळ मृणाल कुलकर्णी (आता बोरकर US ला settled ) नावाची मुलगी होती तिच्या बरोबर असायचे.
मला तेव्हा वर्गा मध्ये नवीन भरती होणाऱ्या मुलींचे खूप च आकर्षण होते.. मला आठवतंय त्या नुसार मुग्धा काकतकर सहावी ला आपल्या वर्गा मध्ये आली. अगदी पहिल्या बेंचवर बसायची दुसऱ्या रो मध्ये.. गोरी गोरी, ठेंगणी ठुसकी अशी.. खूप च शांत आणि समजूतदार वाटायची. नंतर ती A तुकडी मध्ये गेली.. बडबड्या ब मध्ये ती अगदीच misfit होती. तिची एक आठवण म्हणजे तिला बहुतेक दमा होता .. आपली अंजनेरी ला सहल गेली होती तेव्हा तिला खिंडी मध्ये खूपच दम लागला होता. मुग्धा शी खूप जास्त संपर्क आला नाही.
अजून एक मुलगी म्हणजे काळी सावळी खात्या पित्या घराची भैरवी पांडे ... वर्गात शिरल्या शिरल्या दरवाजा च्या समोर च्या बेंच वर बसली होती.. तेव्हा तिच्या शी ओळख करून घेतली.  मग हळू हळू मैत्री ..
तेव्हा च हळू हळू आम्ही एकमेकींकडे जाऊ येऊ लागलो होतो. मनाली , रागिणी, पबाकू इकडे तिकडे सायकल वर जायचा . असाच एकदा भैरवी माझ्या कडे आली होती. खूप खूप झोका खेळली. इतका मोठा झोका कदाचित पूर्वी तिनी कधी पहिला नव्हता... पण एक सल मनात अजून आहे कि ती न जेवता फक्त बिस्कीट खाऊन गेली त्या दिवशी.. नंतर मी पण तिच्या घरी कालिदास कलामंदिर जवळ कुठे तरी गेले होते .. तेव्हा खाल्ले ली भेंडी ची भाजी अजून हि आठवते.  तसच का माहित नाही पण एकदा मेधा च्या घरी गेलो होतो आम्ही...  क्रमश:


Comments

Popular posts from this blog

शाळा पुराण

Bosch Dishwasher Review and Buying guide

माझी आजी ..