Shala... MRSKVM...Part 3


सहावी मध्ये कार्यानुभव मध्ये शिवणकाम हा विषय होता.आठवड्यातून एक दिवस एक च तास. घमंडी बाई होत्या मला वाटत. त्यात एक रुमाल ज्याच्यावर हेम, धावदोरा, उलटी टीप, बटण शिवणे असा काही तरी  आणि लोकरी चा एक पाय मोजा आणि क्रोशा करायचा होता. मुली वर्ग भर इकडून तिकडे सुई दोरा बटन असा सगळं घेऊन फिरायच्या त्या तासाला. शाळे मध्ये हे सगळं करण अवघड होता मग बाई गृहपाठ द्यायच्या आणि बऱ्याच जणी घरून च आई, काकू,मावशी, आत्या अश्या कोणाकडून तरी हे करून आणायच्या. बाई ना पण हे सगळं माहित असणार. तरीही उत्साहा पोटी मी बऱ्याच उलट आणि सुलट टाके घालून काही बाही बनवल होता. सातवी मध्ये तर छोटा स्वेटर करायला होता.. मूल्य शिक्षण आणि कार्यानुभव आवश्यक असावे च असा मला आता वाटतंय. आणि त्याचा ह्या आत्ताच्या lockdown मध्ये खूप फायदा पण झालाय.
शालेय शिक्षण हे फक्त अभ्यास आणि अभ्यास न ठेवता ह्या अशा कार्यानुभव, गायन, व्यायाम, खेळ, कला अश्या विविध अंगी गोष्टी शिकवून शाळे नि आपल्या सर्वांगिण विकासाचा पाया रचला. एकदा शाळे च्या ड्रायविंग हॉल मध्ये कठपुतळी चा एक कार्यक्रम हि मनोरंजन म्हणून पहिला होता.
स्नेहसंमेलन, सहली, आणि लंगडी कब्बडी असे विविधांगी उपक्रम हि शाळेत होत असत.
त्याच काळात परांजपे बाई निवृत्त होऊन सुहासिनी पटेल बाई मुख्याध्यापिका झाल्या. त्या एकदम कडक होत्या.
एक आठवण gathering ची त्या दोन वर्षी मी नाचामध्ये होते. एकदा एकविरा आई तू डोंगरा वरी कि कुठला तरी  कोळीगीत होते आणि एकदा छुन छुन ...असा काहीतरी गाणे होते "चंद्र रोहिणी खेळ खेळुनि रातभरि थकून जाऊं  पहाट होता दूर डोंगरी झोपी जाऊ" कि काय होते.. सगळ्यांना पांढरे फ्रॉक्स आणि डोक्या ला मुकुट .. नाशिक ला घरी अजून तो फोटो आहे. बाकी माझा आणि नृत्य कले चा तेव्हढाच काय तो संबन्ध ..
गायना मध्ये रागिणी मेधा ह्या पुढे असत. एकदा सामूहिक गायना मध्ये मलापण घेतले होते. तसेच एकदा कालिदास कलामंदिर मध्ये आपले राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा / वसंतराव नाईक कि कोणी तरी येणार होते I guess सातवी ला आणि आपल्या सगळ्यांना वीणा केळकर बाई बरोबर auditorium मध्ये  उभे राहून एक स्वागतगीत गायची संधी मिळाली होती. त्या तालिमी आणि शाळेतुन तिथे जाऊन केलेली रंगीत तालीम आठवतेय का ग मुलींनो ...
हस्ताक्षर स्पर्धा पण होत असत ज्या मध्ये generally तृप्ती कित्ते , गायत्री शेवाळे, काश्मीरा , शिल्पा बोहोरा किंवा कामिनी नलावडे बाजी मारत.  एकूण मज्जे मध्ये सगळं चालू होते.
क्रमश:



Comments

Popular posts from this blog

Bosch Dishwasher Review and Buying guide

शाळा पुराण

माझी आजी ..