Shala...MRSKVM...Part 4

सातवी ला श्रद्धा राय नावाची एक गोरी गोड मुलगी आपल्या वर्गात भरती झाली. राय आडनाव ऐकल्यावर बंगाली कि काय असा वाटलं होते. छोट्याश्या चणीची .. एकदा मॉनिटर पण होती. आमचा वर्ग तेव्हा नवीन येणाऱ्या मुलींना छान welcome करत असे. आजकाल सारखी bullying, ignorance किंवा arrogance ची भावना तेव्हा अजिबात नव्हती. सामावून घेणे हा शाळेच्या संस्कृती चा एक अविभाज्य भाग होता.  
हिंदू संस्कृती चे सर्व सण शाळेत साजरे होत असत. श्रावणी सोमवारी अर्धी शाळा , श्रावणी शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ, गणपती उत्सव सगळं काही.. तसच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला होणारं ध्वज वंदन .. त्यादिवशी घालायचा कडक इस्त्री चा गणवेश, पांढरे शुभ्र कॅनवास बूट आणि सॉक्स. कधी कधी चीखलानी माखलेले पांढरे बूट पोलिश शिवाय पांढऱ्या खडू नि पांढरे करून घालायचो... 
कित्ती कित्ती गोष्टी असायच्या शाळे मध्ये .. शिक्षक दिन हा देखील फार विशेष. आपण सातवी च्या मुली साड्या नेसून लहान वर्ग मुलीं (पाचवी / सहावी) च्या वर्गावर शिकवायला जायचो.. खऱ्या शिक्षिकांना त्या दिवशी आराम असायचा. त्या सगळ्या तरुण शिक्षिका ना judge करायच्या. तेव्हा मी पण एकदा शिकवलं होता पण अशी काही फे फे झाली होती .. स्वपनातही मी professor होऊन MIT ला Engineering ला काय किंवा आता BITS Pilani ला working professionals na M.Tech ला शिकवेन असा वाटलं नव्हता. तेव्हा मला वकील च बनावसे वाटे. पण माझ्या बाबांनीं तिथले छक्के पंजे पाहिले असल्याने "मुलींनी कोर्टाची पायरी चढूच नये" असा त्यांचा हट्ट होता.. 
अजून एक आठवण म्हणजे गायन च्या तासा ला माया कुलकर्णी (माकू) बाई होत्या त्या त्रिताल, झप ताल , धा गि ना धा ती ना टाळी वाजवून बोटे हलवून ... आणि शिकवायच्या सा रे ग म .... अंतरा अस्थायी राग काफी , असा काही बरेच . तसेच तबला आणि डग्गा च चित्र पण काढायला लावला होता त्यांनी गायन च्या वहीत. मी त्यांची फार लाडकी होते. माझी गायनाची परीक्षा न घेताच मला अ श्रेणी देऊन टाकत. (कदाचित  हीचा बेसूर आवाज ऐकून त्रास न करून घेणे हा त्यांचा स्वार्थ त्यात दडलेला होता) 
सातवी कि आठवी मध्ये मी गौरी गोऱ्हे बरोबर खूप वेळ असायचे..नंतर अचानक काय झाल माहित नाही पण आम्ही एकमेकींशी अजिबात बोलत नव्हतो अगदी शाळा सोडे पर्यंत... बहुतेक काहीतरी क्षुल्लक कारणा वरून आमच्यात बिनसलं होते. 
आठवी पासून दहावी पर्यंत शाळेची वेळ बदलून दुपार सत्रा मध्ये भरत असे. स्काऊट गाईड हा नवीन विषय असे आणि ब तुकडी ला अर्धे हिंदी ( ५० मार्क्स आणि अर्धे संस्कृत ( ५० मार्क्स ). ताटके बाई संस्कृत शिकवत आणि परदेशी बाई हिंदी... अविवाहित , चापून चोपून नेसलेली साडी आणि साडीच्या च रंगाचं केसात माळलेल खोटे फुल.. लिपस्टिक अश्या परदेशी बाई.. 
क्रमश:

Comments

Popular posts from this blog

Bosch Dishwasher Review and Buying guide

शाळा पुराण

माझी आजी ..