Shala...MRSKVM...Part 5
अजून एका मैत्रिणी चा उल्लेख केल्या शिवाय राहवत नाही. ती म्हणजे गौप्रगो .. जशी पबाकू आणि पदकू तशाच दोन गौप्रगो होत्या शाळेमध्ये. एक अ तुकडीतली आणि एक आपली छोटीशी गोरी गोरी दोन पेडाच्या वेण्या घालणारी गौरी प्रदीप (कि प्रकाश ?) गोखले. अतिशय बडबडी आणि चेहेऱ्यावर खूप तिळाचे जाळं होते तिच्या.. एक आठवण म्हणजे ती , राजश्री ह्या नरोत्तम भुवन पंचवटी जवळ राहत आणि मी गौरी कडे एकदा भोंडल्याला गेले होते. नंतर आठवी ला बहुतेक तिची तुकडी बदलली.
अशीच अजून एक मुलगी प्रीती दिवटे आठवी ला आपल्या वर्गामध्ये आली. शांत सावळी उंच , सरळ नाकाची प्रीती सुरवातीला कोणाशी जास्त बोलत नसे. हळू हळू स्थिर झाली.
आठवी ला हिंदी- संस्कृत, १५० मार्क्स चे गणित (बीजगणित - ७५ मार्क्स आणि भूमिती - ७५ मार्क्स ), science -१५० मार्क्स पैकी जीवशास्त्र, भौतिकशात्र आणि रसायन शास्त्र , ४० मार्क्स प्रत्येकी आणि ३० मार्क्स चे प्रॅक्टिकल , त्याची प्रयोगशाळा असे नवीन नवीन विषय वाढले. साधारण आठवी मध्ये बऱ्याचश्या मुलींनी क्लास लावले. बऱ्याच जणांनी वाड -ओसवाल तर मी घराच्या बाजूलाच , देवधर वाड्या मध्ये गुप्ते क्लास लावला.काही cult लोकांनी बापट बाईंकडे लावला. दुपारची शाळा १२. २० ला भरत असे. त्यामुळे क्लास सकाळी असे. वर्गा मधील खूप मुली गुप्ते क्लासला येत होत्या.पाणी पिण्याच्या, झोका खेळायच्या बहाण्याने त्या आमच्या वाड्यामध्ये पण सतत येत असत. क्लास मध्ये co-ed सिस्टम होती, त्यामुळे एकमेकांना चिडवणे हा क्लास चा अविभाज्य भाग होता..
क्लास मध्ये, गुप्ते सर - इंग्रजी शिकवत, गोरे गोरे,हिरव्या डोळयांचे मिश्किल गुप्ते सर,आमच्याकडून I am / We are/, you are/you are , he,she,it- is/they are, असा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकालामध्ये म्हणून घेत असत. त्यांनी इंग्रजी चा पाया नक्कीच भक्कम झाला आणि पुढे जाऊन मराठी माध्यमाचा न्यूनगंड कधीच आला नाही. LLTT (looking to London, talking to Tokyo) पाटील सर(त्यांना पेठे ची मुलं Don म्हणत) गणित शिकवत. आणि जामदार सर शास्त्र. इथूनच पुढे मला गणित हा विषय मनापासून आवडू लागला त्यातली भूमिती तर फारच favourate ... वकील नाही तर इंजिनीरिंग करू शकू असा वाटायला लागले. आणि एकूण च अभ्यासाची गोडी वाढली. आणि त्याचा परिणाम असा कि आठवी, नववी आणि दहावी मी ब तुकडी मध्ये सतत पहिली आले. वर्गामध्ये स्पर्धा पण होतीच.. मी, नलू, माधुरी, काश्मीरा, दिपाली,गौरी,तृप्ती कित्ते आणि गणिताला तृप्ती घैसास (नववी नंतर) अशी साधारण कॉम्पिटिशन असत असे.
आठवी पासून स्काऊट गाईड विषय आला कार्यानुभव विषय जाऊन.. नवीन गणवेश पण होता गाईड चा त्याची दोरी आणि तिच्या वेगवेगळ्या गाठी , शिट्टी, टोपी काय न काय ... मग सगळ्यांनी सगळं आणल्यावर गाईड च्या ऑफिस मध्ये जाऊन एक शपथ ग्रहण विधी झाला होता. राजपाठक बाई ह्या सगळ्यामध्ये आघाडी सांभाळून असत. त्यांना मदतीला पौर्णिमा आठवले बाई असत.
एकदा कधीतरी व्यायाम च्या वर्गात आपली सीट-अप्स ची परीक्षा झाली होती, ड्राइंग हॉल ला आठवतय का कुणाला? मला आठवतंय माझ्या बरोबर पांडे, मेधाविनी वगैरे होत्या.
क्रमश:
Comments
Post a Comment