Shala...MRSKVM...Part 6

देव: देवौ देवा: प्रथमा पासून झालेलं संस्कृत माला, वनं, शशी असा अकारांत, आकारांत, इकारांत, एकरांत (पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नंपुसकलिंगी) नाम हळू हळू पुढे जाऊ लागल. तसाच ते गच्छामि ते गच्छंती असा क्रियापदा नि पण पुढे जाऊ लागल. प्रश्न जरी संस्कृत मध्ये असला तरी उत्तर मराठी मधेच लिहायच असे. त्यामुळे एक गोष्ट नक्की होती कि रट्टा मारला कि संस्कृत मध्ये पूर्ण मार्क्स मिळत असत. त्याकाळात मी प्रयत्न करून एकदाच वाचल्यावर लक्षात राहील असा एक technique शोधून काढला होता. त्यामुळे मी एकपाठी झाले होते. त्याचा फायदा मला आत्तापर्यंत होत आहे. 
नववी मध्ये उंच धिप्पाड खेळाडू तृप्ती घैसास आपल्या वर्गामध्ये आली आणि एकदम hot favourite होऊन गेली. मी पहिल्यांदा तिच्याच डब्यामध्ये maggie खाल्ली होती. ती अनेकदा पाव भाजी पण घेऊन येत असे. तिच्या पंधराव्या वाढदिवशी आम्ही तिच्या घरी आश्विननगर ला गेलो होतो. तिच्या बंगल्यामध्ये swimming pool होता मला तेव्हा त्याचं फार आश्चर्य वाटलं होता. 
उंची मुळे तिला शेवटच्या बेंच वर बसवलं होत आणि मी बुटकी त्यात मॉनिटर .. त्यामुळे एकदम पुढे ... मग मी मागे जाऊन बसायला लागले.कधी कधी बॉय कट वाल्या (नलिनी कुलकर्णी बाई ) नकु मला ओरडायच्या सुद्धा ..  तिथे एकदम इंटरेस्टिंग मुलींचा भरणा असे..  मानसी,भैरवी, हर्षदा,अदिती, योगिनी, कविता, शिल्पा... अश्या सगळ्या .. म्हणायला थोड्या गुंड मस्तीखोरच. तसाच खिडकी पासून दुसऱ्या रो मध्ये मध्यात कुठेतरी माधुरी/पल्लवी जुन्नरे, अशी एक जोडगोळी सतत काहीतरी कुसूर फुसूर करत बसलेली असायची.. दोघी पण स्वतःला लई भारी (attitude  हा )समजायच्या. एकदा तर PJ/MH  बरोबर चांगल भांडण पण झाला होता ..
जशी तृप्ती वर्गात आली तशी एकदम दादागिरी, टगेगिरी वाढली वर्गामधली.. ती, मोनिका बोरकर, कविता ,ज्योती, नीना अश्या एक से एक डेंजर कबड्डी पटूंनी आपला वर्ग एक नंबर होऊन गेला. आपल्या जोडीला , शुभांगी कर्डीले, शुभदा,अनुराधा अश्या जुनिअर मुलींनी पण मदत केली होती. क तुकडी बरोबर चा कबड्डीचा सामना अतितटीचा आणि अतिरंजक झाला होता. ते वर्गामध्ये बेंच एकमेकांवर रचून तिथे उंचावर बसून प्रॅक्टिस करणाऱ्या मुलींना प्रोत्साहन देणे एवढीच काय ती माझी भूमिका... 
प्रज्ञा केळकर/ निशिगंधा पेंढारकर सारख्या शांत मुली पण होत्या वर्गात अपवादाने .. पण एकूणच ब म्हणजे बडबड च होतो आम्ही ... 
एकदा मी काश्मीराच्या घरी गेले होते. गंजमाळ च्या थोडे पुढे डावीकडे त्यांचा बंगला होता. ते घाणेरडे गलिच्छ गंजमाळ आणि त्याच्या पुढे असलेले हे सुबक घर ... इतका विरोधाभास होता .. 
तिच्या घरी पहिल्यांदा खाकरा आणि त्याच्यावर तूप आणि दाण्याची चटणी दिली होती .. भार्री लागला होता ते प्रकरण. तसाच एकदा मानसी ला शाळेमधेच मधमाशी/ गांधीलमाशी चावली म्हणून तिला घरी सोडायला, शरणपूर रोड ला कॅनडा कॉर्नर जवळ मी आणि तृप्ती गेलो होतो. 
९१-९२ साली शारजाह कप फार रोमहर्षक असत असे. तेव्हा सगळे सामने साधारण १२. ३० - १ ला दुपारी सुरु होत. एकदा भारत- पाकिस्तान मॅच होती तेव्हा दुपारी ... अतितटीं चा सामना ... मला बघायचाच होता मग काय पोट दुखायचा नाटक झाल शाळेत आणि मी घरी.. पण दुर्दैव म्हणजे शारजाह ला कधी नव्हे ते पाऊस पडला आणि सामना झालाच नाही सुरु ...
कित्ती तरी भारत- ऑस्ट्रेलिया मॅचेस, १९९२ चा बेन्सन अँड हेडजेस विश्वचषक , ऑस्ट्रेलिया मध्ये असल्याने पहाटे उठून पहिले होते. तेव्हाच टेनिस च पण आकर्षण वाढत गेला, स्टेफि ग्राफ, मोनिका सेलेस , मारतिना , आगासी, जिमकुरिअर , पीट सम्प्रास , बोरिस बेकर, सगळेच आवडायचे. मज्जा यायची त्या पण मॅचेस बघायला आणि मग शाळेत discussion करायला...   
क्रमश: 
 
  

Comments

Popular posts from this blog

शाळा पुराण

Bosch Dishwasher Review and Buying guide

माझी आजी ..