कृष्णार्पणमस्तु ... १

कृष्णार्पणमस्तु ... १

मध्यंतरी डॉ सुनील साठेंच एक भाषण ऐकलं. इतका मोठा हृदयरोगतज्ज्ञ आणि अध्यात्मिक बाजाचं ते भाषण.

Food for Thought सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ सुनील साठे *Science & spirituality*. त्यात ते सांगतात त्यांना कोणीतरी एक महात्मा भेटला आणि त्यांनी रोज डॉ. ना संध्याकाळी दिवसभर हातून घडलेलं बरं वाईट सगळं देवाला अर्पण करण्यास सांगतात अश्या विषयाचा तो विडिओ होता...तो विडिओ बघितला आणि डोक्यात विचारांचं काहूर माजलं. आणि आजकाल च्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या {आर्टीफिसिअल इंटेलेजेस (AI) युगात YouTube तश्याच विषयाचे अनेक विडिओ सुचवू लागली.. अगदी BK शिवानीच्या  breaking the cycle of negative exchanges, श्री श्री रविशंकर Don't carry the baggage of past अशी सगळ्यांची भाषणे पाहिल्यावर लक्षात आले खरंच कित्ती कित्ती गोष्टी साठवून ठेवल्या आहेत आपणपण मनात. हे मन पण काही अजब रसायनांनी बनलेले असतं, नकारात्मक भावना आणि आठवणींचाच जास्त संचय करत जात... 

सनातन धर्मामध्ये तर सांगितलंच गेलंय ... कृष्णार्पणमस्तु ...पण आपण खरंच वागतो सनातन्या सारखं ??

हे सगळं ऐकत असतानाच The Sustainable Development Goals – A global, transdisciplinary vision for the future चा अभ्यासही चालूच होता, त्यामध्ये UNO युनोच्या  United Nations SDG Sustainable development goals (शाश्वत विकास ध्येये )चे १७ प्रमुख ध्येयांचा अभ्यास करत होते आणि लक्ष्य सारखं पाचव्या लिंग समानता (Gender Equality) आणि दहाव्या विषमता कमी झाली पाहिजे  (reduced inequality) ह्याच ध्येयांमध्ये गुंतून जात होता.. लिंग समानता हे ध्येय शक्यच नाहीय म्हणूनच कि काय दहाव्या नंबरला विषमता कमी झाली पाहिजे होतं. (फक्त स्त्री पुरुष च नाही सर्व सामायिक विषमता)

कदाचित मनामध्ये संचित नकारात्मक भावना आणि आठवणी ह्यांचा जागतिक ध्येयांचा (SDG)नक्की संबंध आहेच.. 

वर नमूद केलेले दोन्ही विषय एकमेकांत वर्षानुवर्षे गुंतलेले होते आणि खूपच गुंतागुंत वाढवत होते.

माझी तर काही इतकी उच्च अध्यात्मिक पोच नाही कि कृष्णार्पणमस्तु म्हटलं आणि सगळा निचरा झाला.. मनातल सगळं साठलेले फेकून देण्यासाठी कोणता ना कोणता तरी आधार लागतोच मग लेखणीचा आधार घेतला. 

क्रमश:


 

Comments

Popular posts from this blog

Bosch Dishwasher Review and Buying guide

शाळा पुराण

माझी आजी ..