Shala...MRSKVM...Part 4
सातवी ला श्रद्धा राय नावाची एक गोरी गोड मुलगी आपल्या वर्गात भरती झाली. राय आडनाव ऐकल्यावर बंगाली कि काय असा वाटलं होते. छोट्याश्या चणीची .. एकदा मॉनिटर पण होती. आमचा वर्ग तेव्हा नवीन येणाऱ्या मुलींना छान welcome करत असे. आजकाल सारखी bullying, ignorance किंवा arrogance ची भावना तेव्हा अजिबात नव्हती. सामावून घेणे हा शाळेच्या संस्कृती चा एक अविभाज्य भाग होता. हिंदू संस्कृती चे सर्व सण शाळेत साजरे होत असत. श्रावणी सोमवारी अर्धी शाळा , श्रावणी शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ, गणपती उत्सव सगळं काही.. तसच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला होणारं ध्वज वंदन .. त्यादिवशी घालायचा कडक इस्त्री चा गणवेश, पांढरे शुभ्र कॅनवास बूट आणि सॉक्स. कधी कधी चीखलानी माखलेले पांढरे बूट पोलिश शिवाय पांढऱ्या खडू नि पांढरे करून घालायचो... कित्ती कित्ती गोष्टी असायच्या शाळे मध्ये .. शिक्षक दिन हा देखील फार विशेष. आपण सातवी च्या मुली साड्या नेसून लहान वर्ग मुलीं (पाचवी / सहावी) च्या वर्गावर शिकवायला जायचो.. खऱ्या शिक्षिकांना त्या दिवशी आराम असायचा. त्या सगळ्या तरुण शिक्षिका ना judge करायच्या. तेव्...