पाध्ये काका ...श्रीनिवास त्रिविक्रम पाध्ये
साधारण ९५-९६ ची गोष्ट.. नाशिक ला गिरिभ्रमण आणि गिर्यारोहणा ची चळवळ वैनतेय संस्थेने सुरु करून ८-१० वर्ष झाली होती आणि आता ती छान फोफावली होती. मी, माझी बहीण समीरा असे काही ओळखीच्या लोकांच्या (या मध्ये प्रामुख्याने ओक काका (शंतनू ओक चे वडील ), चिन्मय पर्वते आणि निशांत खरे ) संपर्काने सामील झालो. वैनतेय ची महिन्या तुन एकदा सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास पेठे हायस्कूल ला मीटिंग असायची. त्यामध्ये झालेल्या ट्रेक चा आढावा आणि पुढील ट्रेक ची आखणी हया महत्वाच्या गोष्टी असत. आणि नवीन सभासदांची ओळख असत असे. मीटिंग संपल्यावर एक उंच गोरेपान गृहस्थ जवळ आले आणि चिन्मयनी त्यांची ओळख करून दिली. हे पाध्ये काका... त्यानंतर त्यांनी स्वतः my pleasure .. मी श्रीनिवास त्रिविक्रम पाध्ये असून पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी करतो अशी ओळख करून दिली. आणि बघता क्षणी तुझे डोळे खूप च छान आहेत ते बघून च तू खूप हुशार असणार आणि मी भाग्यवान आहे अश्या मोठ्या लोकांची ओळख झाल्यामुळे असा एकदम बोलून खुश करून टाकल. पाध्ये काकांनी वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण या नाश...