Posts

पावभाजी ... जना मनातली... आणि हृद्य आठवणीतली

पावभाजी पुराण ... जना मनातली... आणि हृद्य आठवणीतली  पुण्यात आता मस्त थंडी पडायला लागलीय.. आणि थंडी म्हटलं कि बाजार अगदी कसा खुलून जातो छान छान ताज्या स्वच्छ भाज्यांनी. थंडीमध्ये करायची अनिवार्य गोष्ट म्हणजे पावभाजी ... परवाच मस्त शुभ्र गोरापान फ्लॉवर , हिरवी हिरवी गावरान सिमला मिरची,  नखरेल गोड गोड मटार आणि रसरशीत लाल लाल टोमॅटो मिळाले.. मग काय मस्त पावभाजीचा बेत ठरला. छान पैकी घरी रवी नि घुसळून आलेलं लोणी होतच हाताशी.. मग ठरवलं अमूल बटर पेक्षा आज लोण्यामध्ये पावभाजी करू... आणि सोबतीला गरम गरम पाव.. लिंबाची फोड आणि बारीक चिरलेल्या कांदा कोथिंबिरीची नक्षी.. अहाहा स्वर्गसुख म्हणतात ते हेच.  पहिलाच घास खाल्ला आणि मन एकदम पावभाजीच्या हिंदोळ्यावर डोलू लागलं.  अगदी ३० वर्ष मागे गेले... तेव्हा मी पाचवी सहावी मध्ये असेन. दरवर्षी शिरस्त्या प्रमाणे आम्ही सुट्ट्यांमध्ये एकदा पुणे आणि एकदा मुंबई ला जायचो.  पुणे मुंबई च्या तुलनेत नाशिक तेव्हा तसं छोटसं टुमदार शहर (छे गाव च ) होते..घरी पावभाजी सारखे पदार्थ अभावानेच बनत.. हॉटेल मध्ये खाण...

पाध्ये काका ...श्रीनिवास त्रिविक्रम पाध्ये

 साधारण ९५-९६ ची गोष्ट.. नाशिक ला गिरिभ्रमण आणि गिर्यारोहणा ची चळवळ वैनतेय संस्थेने सुरु करून ८-१० वर्ष झाली होती आणि आता ती छान फोफावली होती. मी, माझी बहीण समीरा असे काही ओळखीच्या लोकांच्या (या मध्ये प्रामुख्याने ओक काका (शंतनू ओक चे वडील ), चिन्मय पर्वते आणि निशांत खरे ) संपर्काने सामील झालो. वैनतेय ची महिन्या तुन एकदा सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास पेठे हायस्कूल ला मीटिंग असायची. त्यामध्ये झालेल्या ट्रेक चा आढावा आणि पुढील ट्रेक ची आखणी हया  महत्वाच्या गोष्टी असत. आणि नवीन  सभासदांची ओळख असत असे. मीटिंग संपल्यावर एक उंच गोरेपान गृहस्थ जवळ आले आणि चिन्मयनी त्यांची ओळख करून दिली. हे पाध्ये काका... त्यानंतर त्यांनी स्वतः my pleasure .. मी श्रीनिवास त्रिविक्रम पाध्ये असून पंजाब नॅशनल  बँकेमध्ये नोकरी करतो अशी ओळख करून दिली. आणि बघता क्षणी तुझे डोळे खूप च छान आहेत ते बघून च तू खूप हुशार असणार आणि मी भाग्यवान आहे अश्या मोठ्या लोकांची ओळख झाल्यामुळे असा एकदम बोलून खुश करून टाकल.  पाध्ये काकांनी वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण या नाश...

Shala...MRSKVM...Part 7

Shala...MRSKVM...Part 6

देव: देवौ देवा: प्रथमा पासून झालेलं संस्कृत माला, वनं, शशी असा अकारांत, आकारांत, इकारांत, एकरांत (पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नंपुसकलिंगी) नाम हळू हळू पुढे जाऊ लागल. तसाच ते गच्छामि ते गच्छंती असा क्रियापदा नि पण पुढे जाऊ लागल. प्रश्न जरी संस्कृत मध्ये असला तरी उत्तर मराठी मधेच लिहायच असे. त्यामुळे एक गोष्ट नक्की होती कि रट्टा मारला कि संस्कृत मध्ये पूर्ण मार्क्स मिळत असत. त्याकाळात मी प्रयत्न करून एकदाच वाचल्यावर लक्षात राहील असा एक technique शोधून काढला होता. त्यामुळे मी एकपाठी झाले होते. त्याचा फायदा मला आत्तापर्यंत होत आहे.  नववी मध्ये उंच धिप्पाड खेळाडू तृप्ती घैसास आपल्या वर्गामध्ये आली आणि एकदम hot favourite होऊन गेली. मी पहिल्यांदा तिच्याच डब्यामध्ये maggie खाल्ली होती. ती अनेकदा पाव भाजी पण घेऊन येत असे. तिच्या पंधराव्या वाढदिवशी आम्ही तिच्या घरी आश्विननगर ला गेलो होतो. तिच्या बंगल्यामध्ये swimming pool होता मला तेव्हा त्याचं फार आश्चर्य वाटलं होता.  उंची मुळे तिला शेवटच्या बेंच वर बसवलं होत आणि मी बुटकी त्यात मॉनिटर .. त्यामुळे एकद...

Shala...MRSKVM...Part 5

अजून एका मैत्रिणी चा उल्लेख केल्या शिवाय राहवत नाही. ती म्हणजे गौप्रगो .. जशी पबाकू आणि पदकू तशाच दोन गौप्रगो होत्या शाळेमध्ये. एक अ तुकडीतली आणि एक आपली छोटीशी गोरी गोरी दोन पेडाच्या वेण्या घालणारी गौरी प्रदीप (कि प्रकाश ?) गोखले. अतिशय बडबडी आणि चेहेऱ्यावर खूप तिळाचे जाळं होते तिच्या.. एक आठवण म्हणजे ती , राजश्री ह्या नरोत्तम भुवन पंचवटी जवळ राहत आणि मी गौरी कडे एकदा भोंडल्याला गेले होते. नंतर आठवी ला बहुतेक तिची तुकडी बदलली.  अशीच अजून एक मुलगी प्रीती दिवटे आठवी ला आपल्या वर्गामध्ये आली. शांत सावळी उंच , सरळ नाकाची प्रीती सुरवातीला कोणाशी जास्त बोलत नसे. हळू हळू स्थिर झाली.  आठवी ला हिंदी- संस्कृत, १५० मार्क्स चे गणित (बीजगणित - ७५ मार्क्स आणि भूमिती - ७५ मार्क्स ), science -१५० मार्क्स पैकी जीवशास्त्र, भौतिकशात्र आणि रसायन शास्त्र , ४० मार्क्स प्रत्येकी आणि ३० मार्क्स चे प्रॅक्टिकल , त्याची प्रयोगशाळा असे नवीन नवीन विषय वाढले. साधारण आठवी मध्ये बऱ्याचश्या मुलींनी क्लास लावले. बऱ्याच जणांनी वाड -ओसवाल तर मी घराच्या बाजूलाच , देवधर वाड्या मध्ये गुप्त...

Shala...MRSKVM...Part 4

सातवी ला श्रद्धा राय नावाची एक गोरी गोड मुलगी आपल्या वर्गात भरती झाली. राय आडनाव ऐकल्यावर बंगाली कि काय असा वाटलं होते. छोट्याश्या चणीची .. एकदा मॉनिटर पण होती. आमचा वर्ग तेव्हा नवीन येणाऱ्या मुलींना छान welcome करत असे. आजकाल सारखी bullying, ignorance किंवा arrogance ची भावना तेव्हा अजिबात नव्हती. सामावून घेणे हा शाळेच्या संस्कृती चा एक अविभाज्य भाग होता.   हिंदू संस्कृती चे सर्व सण शाळेत साजरे होत असत. श्रावणी सोमवारी अर्धी शाळा , श्रावणी शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ, गणपती उत्सव सगळं काही.. तसच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला होणारं ध्वज वंदन .. त्यादिवशी घालायचा कडक इस्त्री चा गणवेश, पांढरे शुभ्र कॅनवास बूट आणि सॉक्स. कधी कधी चीखलानी माखलेले पांढरे बूट पोलिश शिवाय पांढऱ्या खडू नि पांढरे करून घालायचो...  कित्ती कित्ती गोष्टी असायच्या शाळे मध्ये .. शिक्षक दिन हा देखील फार विशेष. आपण सातवी च्या मुली साड्या नेसून लहान वर्ग मुलीं (पाचवी / सहावी) च्या वर्गावर शिकवायला जायचो.. खऱ्या शिक्षिकांना त्या दिवशी आराम असायचा. त्या सगळ्या तरुण शिक्षिका ना judge करायच्या. तेव्...

Shala... MRSKVM...Part 3

सहावी मध्ये कार्यानुभव मध्ये शिवणकाम हा विषय होता.आठवड्यातून एक दिवस एक च तास. घमंडी बाई होत्या मला वाटत. त्यात एक रुमाल ज्याच्यावर हेम, धावदोरा, उलटी टीप, बटण शिवणे असा काही तरी  आणि लोकरी चा एक पाय मोजा आणि क्रोशा करायचा होता. मुली वर्ग भर इकडून तिकडे सुई दोरा बटन असा सगळं घेऊन फिरायच्या त्या तासाला. शाळे मध्ये हे सगळं करण अवघड होता मग बाई गृहपाठ द्यायच्या आणि बऱ्याच जणी घरून च आई, काकू,मावशी, आत्या अश्या कोणाकडून तरी हे करून आणायच्या. बाई ना पण हे सगळं माहित असणार. तरीही उत्साहा पोटी मी बऱ्याच उलट आणि सुलट टाके घालून काही बाही बनवल होता. सातवी मध्ये तर छोटा स्वेटर करायला होता.. मूल्य शिक्षण आणि कार्यानुभव आवश्यक असावे च असा मला आता वाटतंय. आणि त्याचा ह्या आत्ताच्या lockdown मध्ये खूप फायदा पण झालाय. शालेय शिक्षण हे फक्त अभ्यास आणि अभ्यास न ठेवता ह्या अशा कार्यानुभव, गायन, व्यायाम, खेळ, कला अश्या विविध अंगी गोष्टी शिकवून शाळे नि आपल्या सर्वांगिण विकासाचा पाया रचला. एकदा शाळे च्या ड्रायविंग हॉल मध्ये कठपुतळी चा एक कार्यक्रम हि मनोरंजन म्हणून पहिला होता...